व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

BREAKING NEWS-चार्जिंगला लावलेल्या दुचाकीचा स्फोट;भिषण आगीत एकात कुटूंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू

छञपती संभाजी नगर येथील घटना

0

click2ashti update-छत्रपती संभाजी नगर येथे
आज पहाटे 3 च्या सुमारास छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली.या आगीत दुकानात वरच्या मजल्यावर असलेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या मृतांमध्ये 2 पुरुषांसह 3 महिला आणि दोन मुलांचा देखील समावेश आहे.

आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते. जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात ही आग लागली. या घरातील पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.अग्निशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.
सात जणांचा झाला होरपळून मृत्यू
या इमारतीला पहाटे 4 च्या सुमारास अचानक आग लागली. कपड्याचे दुकान असल्याने आग काही वेळातच पसरली. यात दुकानात वरच्या मळ्यात झोपलेले एकाच कुटुंबातील सात जण होरपळून ठार झाले. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.या आग लागलेल्या इमारतीत एकूण 16 लोक होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर 2 लोक होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे.
चार्जिंगच्या दुचाकीमध्ये स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार एका चार्जिंगच्या दुचाकीमध्ये जोराचा स्फोट झाला. यावेळी या दुचाकीला चार्जिंगसाठी चार्जर लावण्यात आलेले होते. त्यामुळे वायरच्या माध्यमातून आग थेट दुकानात लावलेल्या चार्जिंग सॉकेटपर्यंत पोहचली आणि दुकानात देखील आग लागली.कपड्याचे दुकान असल्याने काही वेळातच आग संपूर्ण दुकान आणि त्यानंतर ईमारतमध्ये पसरली.विशेष म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असल्याने खालच्या लोकांना वरती जाता आले नाही.त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील लोकांना वाचवण्यात अपयश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.