व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार गट)अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदी डाॅ.नदिम शेख यांची निवड

0

click2ashti update-लोकसभा निवडणूकीत दणदणीत महाराष्ट्रात विजय मिळविल्याने राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व विभागातील पदनियुक्ती जाहिर करत असून,नुकतीच संभाजी नगर येथील मेळाव्यात प्रदेशध्यक्ष जंयत पाटील यांच्याहस्ते आष्टी येथील डाॅ.नदीम शेख यांची बीड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.


आष्टी शहरातील कायम समाज कार्यात अग्रेसर असलेले डाॅ.नदिम शेख यांची राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी (शरद पवार गट) ने दखल घेत त्यांची बीड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड केली आहे.त्यांना निवडीचे नियुक्ती पञ प्रदेशध्यक्ष जंयत पाटील,युवक प्रदेशध्यक्ष महेबुब शेख यांच्या उपस्थितीत छञपती संभाजी नगर येथील कार्यक्रमात देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.आपल्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी चोखपणे बजावून राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी व शरद पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करणार असून अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डाॅ.नदिम शेख यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.