आष्टीचा भूमिपुत्र शिवाजी हंबर्डे अमरनाथ यात्रेत गुंफेजवळ देवदूत म्हणून देतोय पहारा
click2ashti update-हिंदू धर्मात पवित्र मानले जाणारी अमरनाथ यात्रेला जुलै महिन्यात सुरुवात झाली.देशभरातुन अनेक भाविक दर्शनासाठी येतात.अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा कारवायांना आळा घालण्यासाठी आपले जवान राहून भाविकांसाठी देवदूत म्हणून यात्रा काळात तैनात असतात.यावर्षीच्या यात्रा बंदोबस्ताच्या तुकडीत आष्टीचे भूमिपुत्र शिवाजी हंबर्डे हा लष्करातील जवान आपल्या जीवाची बाजी लावून भाविकांची मदत करत आहेत.आष्टी तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक भाविक अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांची मनोभावे सेवा शिवाजी अरुण हंबर्डे यांनी केले असून या सेवेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आष्टी शहरातील हंबर्डे वस्ती येथील भूमिपुत्र असलेला भारत तिब्बत सीमा पोलीस (ITBP) दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेला शिवाजी अरुण हंबर्डे हा जवान अमरनाथ यात्रेत आपले कर्तव्य बजावत आहे.२००३ भरती होत देशसेवेत त्याने दिल्लीसह केदारनाथ मंदिर ढगफुटी ढगफुटी आपत्ती असो किंवा सिक्कीम येथील भूकंप असो नेपाळ येथील भूकंप अशा अनेक आपत्तीत त्यानी एनडीआरएफ च्या दलात काम करून आपत्तीग्रस्त भागात आपले कर्तव्य बजावले आहे.यावर्षी सुरू असलेल्या पवित्र अमरनाथ(बर्फानी बाबा)यात्रेच्या गुफेजवळ आपले कर्तव्य बजावत आहे.दररोज अनेक भाविकांची सेवा करण्याचे काम तो करत आहे.हिमालयाच्या कुशीत कर्तव्य बजावणे म्हणजे आपल्या जीवाची बाजी लावून देशाची सेवा करणे होय मात्र हवालदार शिवाजी हंबर्डे हा जवान देश सेवा हीच ईश्वर सेवा असे मनात धरून देशाची सेवा करत अमरनाथ यात्रेत पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत आपले कर्तव्य बजावत आहे.तो एक महिनाभर अमरनाथ यात्रेच्या गुफेजवळ आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्या या कार्याला सलाम.त्यांच्या तुकडीत ३२ जवान कार्यरत असून भाविकांना होणाऱ्या त्रासामध्ये मदत करणे भाविकांना बर्फानी बाबाच्या दर्शनात काही अडचण असल्यास त्यांना मार्गदर्शन करतात.अनेक अडचणींवर मात करून अमरनाथ बाबा बर्फानीचे आपले जवान भाविकांचे दर्शन घडवून आणतात.जवानांच्या सहकार्याने दर्शन अतिशय सुखकर होते.अनेक भाविकांना आम्ही या काळात मदत केली आहे. महाराष्ट्रातील भाविक अमरनाथ यात्रेत आपल्या मातीतील माणसं भेटल्याने मनाला वेगळेच समाधान होते अशी भावना यावेळी शिवाजी हंबर्डे यांनी व्यक्त केली.
माझे दर्शन शिवाजी मुळेच झाले
मी 11 जुलै रोजी सतीश धोंडे (फौजी),डोमकावळे व पत्रकार गणेश दळवी असे आम्ही चौघेजण अमरनाथ यात्रेसाठी गेलो होतो.परंतु बालटानहुन-बर्फानी बाबाच्या गुफे पर्यंत जाण्यासाठी जी कसरत झाली.त्याचे शब्दांत वर्णन होऊ शकत नाही.तिथे जाऊनही मी
मंदिराच्या दारातुनच दर्शन घ्यायचे ठरविले.कारण दर्शन घेण्याची सहनशक्तीच नव्हती.आणि मला आपल्या आष्टीचा भूमीपुत्र शिवाजी हंबर्डे कर्तव्यावर असल्याचे दिसले आणि जणू काय बर्फांनी बाबांनीच माझे दर्शन करुन घेतले.
-तुकाराम भोगाडे,यात्रेकरु
गावाकडचे माणसं भेटल्यावर समाधान वाटतं
मी गेल्या वीस वर्षापासून कर्तव्यावर आहे मी अनेक राज्यात नोकरी केली.यावर्षी माझी ड्युटी अमरनाथच्या गुफेजवळ आली.या येथे महाराष्ट्रातील माणूस दिसला तर समाधान वाटतं आणि त्यापेक्षा जास्त गावाकडला माणूस आला तर जास्त वाटते.येथे आलेल्या सर्वांना आपण भेटू शकत नाही.पण मराठी बोललेला गावाकडील दिसलेल्या माणसांना बोलत बरं वाटतं मला यावर्षीच्या जवळपास शेकडो यात्रे करून भेटले त्याचे समाधान वेगळच आहे.
-शिवाजी हंबर्डे,(ITBP जवान)