व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

“ये पब्लिक है ये सब जानती है..”-आमदार महोदय हे जरा जास्तच होतंय…!

नगराध्य जिया बेग यांचा प्रसिध्दी पत्राद्वारे आरोप

0

click2ashti update-मतदार संघाचे कर्तव्यदक्ष असलेले आमदार साहेब आज आलेले ट्रांसफार्मर हे कोणत्या योजनेतून आले आहे.याची आपण अगोदर चौकशी करावी,उलट माजी मंत्री सुरेश धस यांनी(RDSS)या योजनेसाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला होता.याचे सुरेध धस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर पुरावे देखील पत्रकारांना दिले होते.आपण याचा आतापर्यंत एकही पुरावा न देता किंवा पत्र न दाखवता.टिमकी वाजवून खोटी जाहिरात बाजी केलेल्या (RDSS) या योजनेचा आणि या 50 मेगावॉट या ट्रांसफार्मर आलेल्या चा काही एक संबंध नसताना आज आपल्या स्वतःच्या सोशल मीडियावर टिमकी वाजवत आपणच आणल्याचा आव आणत आहात हे 50 मेगावॉटचा ट्रान्सफॉर्मर आणि रेडीऐटर आहे.आणि हे महापारेषण कंपनीच्या ऑगंमेटेशन योजनेतून आलेले आहे.त्यामुळे “ये पब्लिक है ये सब जानती है..”-आमदार महोदय हे जरा जास्तच होतंय…!असा आष्टी चे नगराध्यक्ष जिया बेग यांनी आमदार आजबे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.

नगराध्यक्ष जिया बेग

यावेळी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे जिया बेग म्हणाले,
वीज पुरवठयाची 24 तासाच्या रीडिंगनुसार मागणी आणि पुरवठाच्या आवश्यकतेप्रमाणे लोड डिव्हाईड करण्याकरिता महा पारेषण कंपनीने पाठवलेले साहित्य असून यामध्ये आणखी बरेचसे साहित्य येण्याचे बाकी असल्याचे माहिती कळतेय.यामध्ये बुशिंग,200 ते 300 ऑईलचे बॅरेल केबल आणि त्याची बॉडी असे साहित्य येणार आहेत. या योजनेचा आणि (RDSS) या योजनेचा काही एक संबंध नसताना आमदार महोदयसाहेब आपण चुकीची माहिती जनतेला देत दिशाभूल करत आहात.आमदार महोदय साहेबांनी जरा चौकशी करावी आणि मगच गाजावाजा करावा आणि जनतेची दिशाभूल थांबवा असेही पत्रकात म्हटले आहे.

आष्टी-शहरात महापारेषण कंपनीचे आलेले विद्युत साहित्यांचे कंटेनर दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.