व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

महंत रामगिरी महाराजांवर आष्टी सह जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल,वादग्रस्त वक्तव्यामुळे आष्टी,बीड,गेवराईत नोंद

तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे गुन्हे केले वर्ग

0

click2ashti update-वादग्रस्त वक्तव्यामुळे नगर जिल्ह्यातील सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांच्यावर, रविवारी बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले.आष्टी,बीड शहर,आणि गेवराई पोलिसांत ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांनी, सप्ताहातील प्रवचनादरम्यान मुस्लिम समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत.त्यामुळे आष्टीमध्ये शनिवारी मुस्लिम बांधव आक्रमक झाले होते. कारवाईसाठी विविध ठिकाणी निवेदने दिली गेली.यासह बीड शहर ठाण्यात एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख यांनी तक्रार दिली.तर,गेवराई ठाण्यात सय्यद हुसेनी यांनी तक्रार दिली.तर आष्टी पोलिस ठाण्यात नाजीम शेख यांनी भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली. त्यावरुन बीड शहर,आष्टी व गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवले.
तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे गुन्हे केले वर्ग
दरम्यान, महंत रामगिरी महाराज यांच्यावर याच प्रकरणात यापूर्वी नाशिकच्या सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यामुळे बीड पोलिसांनी तिन्ही गुन्हे सिन्नर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.