व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी शहरातील गोंधळ गल्लीत चोरी,नागरिकांनी सतर्क राहावे

0

click2ashti update-तालुक्यात आष्टी शहर व शिराळ येथे घरफोडीच्या घटना घडल्या.यात १ लाखाहून अधिकचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.आष्टीजवळील चिंचाळा येथे मंदिराची दानपेटी फोडताना एकाला नागरिकांनी पकडले.
आष्टी शहरातील आरेफ नूरखान पठाण हे घर बंद करून कुटुंबीयांसह झोपले होते.(दि.१६) ऑगस्ट रोजी पहाटे चोरट्यांनी कपाट उघडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि १० हजार ५०० रुपयांची रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी आष्टी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.दुसरी घटना आष्टी तालुक्यातील शिराळ येथे घडली. नंदा खेडकर या सकाळी घर बंद करून शेतात गेल्या होत्या.बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपयांची रोकड असा एकूण ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.चिंचाळा येथे १६ ऑगस्ट रोजी रात्री बाबासाहेब महाराज मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून गणेश दत्तू कांबळे (रा.देसूर,ता.आष्टी) याने प्रवेश केला.दानपेटी फोडत असताना ग्रामस्थांनी त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.या प्रकरणी गुन्हा नोंद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.