व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

फाशी द्या..फाशी द्या…बलात्कारीत आरोपींना फाशी द्या…!

0

click2ashti update-बदलापूर आणि कोलकत्ता अत्याचार घटनेतील आरोपींना फाशी देण्यासाठी कडा येथील सर्व शाळांमधील तीन हजार मुलींनी सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काढली या रॅलीमध्ये सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.तसेच आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

कडा-शहरातील तीनहजार शाळकरी मुलींनी निषेध रॅली काढून निषेध व्यक्त केला.

गेल्या काही दिवसापूर्वी बदलापूर आणि कोलकाता येथील घटना या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घडल्या असून लहान लहान मुलींवर अत्याचार झाले आहेत.आम्ही सहन तरी किती दिवस करणार याच्या निषेधार्थ कडा येथील श्रीराम विद्यालय,मोतीलाल कोठारी विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भगिनी निवेदिता शाळा, लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूल,पी एम ज्युनिअर कॉलेज,डी.फार्मसी च्या जवळपास तीन हजार विद्यार्थिनींनी शहरातून निषेध रॅली काढली. फाशी द्या,फाशी द्या आरोपींना तात्काळ फाशी द्या,महिलांचे संरक्षण करा,मुलींचे संरक्षण करा,अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

संपूर्ण गावातून निषेध रॅली काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा शेवट करण्यात आला.या ठिकाणी अनेक मुलींनी भाषणे केले.या भाषणातून सरकारवर प्रचंड असा रोष दिसून येत होता.सरकार फक्त बेटी बचाव बेटी पढाव असा नारा देत आहे. मग महिला व मुलींची सुरक्षा कोण करणार. मुली आज रस्त्याने निर्भयपणे फिरू शकत नाहीत.तर आम्हाला शस्त्र परवाना द्या अशी मागणी राजनंदिनी ढोबळे,प्राची पोकळे ज्ञानेश्वरी अनारसे केली.यावेळी कड्याचे सपोनी विजय नरवाडे यांनी कायद्याबद्दल माहिती सांगितली तसेच जर कुठे छेडछाडीचे प्रकार झाले तर 100 112 102 या नंबर वर कॉल करण्याचे आवाहन केले तसेच मुलींनीही धाडस दाखवून तक्रारी देण्याची आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी औषध निर्माण शास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींनी पथनाटिका सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.