जयदत्त सुरेश धस मित्र मंडळ आयोजित भव्य दहिहंडी महोत्सवाचा लाभ घ्या-संजय आजबे
click2ashti update-आष्टी शहरात जयदत्त सुरेश धस मित्र मंडळाच्यावतीने अतिशय भव्यदिव्य दहीहंडी आष्टी महोत्सव २०२४ आज बुधवार(दि.२८)ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता साजरा केला जाणार आहे.या भव्य दहीहंडी महोत्सवाचा मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी बीड जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे यांनी केले आहे.
आष्टी शहरातील पंचायत समिती प्रांगणात युवा नेते जयदत धस मित्र परिवार आष्टी,पाटोदा, शिरुर यांच्यावतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवासाठी माजी मंत्री सुरेश धस यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक,सिने अभिनेत्री सई मांजरेकर,झेबा शेख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या महोत्सवामध्ये डीजेच्या तालावर तरुणाई धीरकणार असून प्रसिद्ध सुत्रसंचालिका निशा कुसेकर या सूत्रसंचालन करणार असून या महोत्सवाची जोरदार तयारी झाली आहे.मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून लाभ घ्यावा आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे यांनी केले आहे.