व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कड्यात टॅकरची दुचाकीला धडक;दुचाकीवरील पत्नी जागीच ठार

टॅकर चालक पोलिसांच्या ताब्यात

0

click2ashti update-आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील महादेव आंधळे हे पत्नी आजारी असल्याने तिला कडा येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवून घेऊन आले होते.दवाखान्याचे काम आवरल्यानंतर पती,पत्नी आपल्या मालकीच्या दुचाकीवरून निघाले असता टॅकरच्या धडकेने पत्नी जागीच ठार झाली.

याबाबत अधिक माहिती अशी,तालुक्यातील लिंबोडी येथील महादेव आंधळे हे पत्नी आजारी असल्याने तिला कडा येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवून घेऊन आले होते. दवाखान्याचे काम आवरल्यानंतर पती,पत्नी आपल्या मालकीच्या दुचाकीवरून एम.एच २३,बी.ई.६०१० या लुना दुचाकीवरून घराकडे निघाले असता गुरूवार (दि.५)रोजी सकाळी अकराच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथील दुध संकलन क्रेंदात टॅकर क्रमांक एम.एच १६,सी.सी.९०९९ हा दुध खाली करून गुरूवारी सकाळी कडा येथील घरी जात असताना टॅकरच्या पाठीमागील बाजूचा धक्का दुचाकीला लागल्याने दुचाकीवरील सुक्षला महादेव आंधळे (वय ६५) वर्ष या टायरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तर पती महादेव केराजी आंधळे (वय ६०) वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत.कडा पोलिस चौकीच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन टॅकरसह चालकाला ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.