चाळीस वर्षांत हे चार नेते सोडून मतदारसंघाला नवा पर्याय म्हणून मी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात-सुशिला मोराळे
आष्टीत पत्रकारांशी साधला संवाद
click2ashti update-आष्टी-गेल्या 40 वर्षापासून आष्टी मतदार संघाचे राजकारण धोंडे,धस,दरेकर,आजबे या चार घरांच्यख भोवतीच असून,आता जनता यांना त्रासली आहे.त्यासाठी मी या मतदारसंघाची सून आणि आमदारीचा नवा पर्याय व मतदारसंघाच्या विकासासाठी येणा-या विधानसभा निवडणुक रिंगणात उतरुन खा.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन सुशिला मोराळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
गेल्या महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुशीला मोराळे यांनी जनसंवाद दौरा सुरु केला आहे.त्या अनुषंगाने रविवार (दि.९)रोजी आष्टी तालुक्यात आले असता सायंकाळी ६ वा.आष्टी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मोराळे बोलत होत्या.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या,गेल्या ४५ वर्षात या मतदारसंघाने २० वर्ष भिमराव धोंडे,१५ वर्ष सुरेश धस व पाच-पाच वर्ष दरेकर आणि आजचे ह्यांनी आमदारकी भोगली आहे.आता याचारही नेत्यांना मतदार संघातील जनता त्रासली आहे.आत्ता पर्यंत मतदार संघात आमदारकीचा नवा पर्याय नव्हता आता मी खा.शरद पवार यांच्या आदेशाने आणि साथीने आष्टी मतदारसंघाची सून या नात्याने निवडणूक लढविणार असून विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.