आष्टी तालुक्यातील लकी ड्रॉ द्वारे निवड झालेल्या ८४० शेतकऱ्यांना मोफत बॅटरी फवारणी पंपाचे वाटप
आष्टी कृषी कार्यालयात केले वाटप
click2ashti update-आष्टी महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत कापुस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढसाठी आष्टी तालुक्यातील लकी ड्रॉ द्वारे निवड झालेल्या ८४० शेतकऱ्यांना बॅटरी फवारणी पंपाचे वाटप गुरुवारी कृषी कार्यालयात करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत गेल्या काही दिवसापूर्वी महाडीबीटी वर शेतकऱ्यांना बॅटरी पंपासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.त्या अर्जाची ऑनलाईन लकी ड्रॉ द्वारे सोडत झाली असून आष्टी तालुक्याला पहिल्या टप्प्यामध्ये 840 शेतकऱ्यांना मोफत बॅटरीवर चालणारे फवारणी पंप मिळाले आहेत.गुरुवार दिनांक 12 रोजी कृषी कार्यालय जळगाव येथे कृषी विभागाच्या वतीने सदरील शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले.यावेळी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,मंडळ कृषी अधिकारी प्रशांत पोळ,स्वप्नील जगधने,अर्जुन सूर्यवंशी,प्रमोद खुराळे,पर्यवेक्षक घनश्याम सोनवणे,राजेंद्र धोंडे आदींच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप वाटप करण्यात आले.
ऑनलाइन हजारो अर्ज प्राप्त
महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत कापुस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढसाठी बॅटरी पंपासाठी आष्टी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केले.त्याचा आकडा आपल्याला निश्चित कळत नाही.परंतु ज्या शेतकऱ्यांची यासाठी निवड झाली.त्यांची यादी आमच्याकडे प्राप्त होते.त्यानुसार आमच्याकडे 840 जणांची यादी प्राप्त झाली असून गुरुवारी 550 जणांना उर्वरित आज वाटप सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले.