व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जिल्हा बालकल्याण समितीने बाल संगोपन पात्र लाभार्थी मेळाव्यामध्ये दिली ४०० अर्जांना मंजुरी

0

click2ashti update-महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचे वतीने अनाथ,निराधार,निराश्रित,० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना प्रत्येक महिन्याला २२५० रुपये अनुदान मिळणार असून जिल्हा बाल कल्याण समितीने आष्टी येथील पात्र लाभार्थी मेळाव्यामध्ये ४०० अर्ज मंजूर केले असल्याची माहिती
बीड जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिली.

आष्टी तालुक्यातील शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित आधार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र आष्टी आणि साईराम शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित नवजीवन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र बीड ता.जिल्हा बीड या दोन संस्थांच्या वतीने दाखल केलेल्या लाभार्थींच्या प्रत्येकी २०० असे ४०० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.महिला व बाल विकास विभाग यांचे वतीने राज्यातील ० ते १८ या वयोगटातील अनाथ,निराधार,निराश्रित, बेघर,एकच पालक,घटस्फोट,पालक विभक्तीकरण,पालकांना गंभीर आजार असणे,पालक रुग्णालयात असणे,कुटुंबातील न्यायालयीन वाद, तुरुंगातील बंदी असलेल्यांची बालके,कुष्ठरोग,एचआयव्हीग्रस्त यांची बालके तीव्र मतिमंद बालके,४० टक्के अधिक दिव्यांग बालके आणि दोन्ही पालक दिव्यांग असणाऱ्यांची बालके या योजनेसाठी पात्र आहेत.या बालकांना प्रतिमा २२५० रुपये अनुदान मिळणार आहे.
आष्टी येथील पोकळे कॉम्प्लेक्स या ठिकाणी या बाल संगोपन पात्र लाभार्थी मेळाव्यामध्ये जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे,सुरेश राजहंस आणि तत्वशील कांबळे हे दोन बालकल्याण समितीचे सदस्य यांनी या मेळाव्यामध्ये ४०० लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर केले.
मेळावे घेऊन प्रस्ताव मंजूर
आष्टी येथील आधार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संगोपन केंद्र आणि नवजीवन क्रांतीचे सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र बीड यांचे वतीने दाखल झालेल्या प्रस्तावांची छाननी करून,या लाभार्थ्यांना बीड येथे बोलवणे ऐवजी त्यांची जाणे आणि येणे ही अडचण लक्षात घेऊन आम्ही बालकल्याण समिती च्या वतीने आष्टी येथे येऊन मेळाव्यामध्ये हे प्रस्ताव मंजूर केले.
अशोक तांगडे,अध्यक्ष जिल्हा बालकल्याण समिती,बीड
अनुदान नाही मिळाले तरी सुविधा देणार-पोकळे
ज्या लाभार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने अंतर्गत अनुदान न मिळाल्यास आम्ही साई बाल सदन बालगृह आष्टी या संस्थेतर्फे या लाभार्थ्यांचे शिक्षण निवास भोजन आरोग्य तपासणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.
सुखदेव पोकळे,अध्यक्ष शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिक्षण प्रसारक मंडळ

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.