व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कन्या शाळेत रंगली चित्रकला स्पर्धा;आकर्षक चित्रांनी वेधले अनेकांचे लक्ष

0

click2ashti update-गणेश उत्सवानिमित्त आष्टी शहरात आज मराठी डिजिटल माध्यम समूह प्रस्तुत आष्टी आणि कडा शहरातील 9 शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून शनिवारी कन्या शाळेत आयोजित केलेल्या चित्रकले स्पर्धेत दोनशे मुलींनी सहभाग नोंदवत आकर्षक चित्र काढून उपस्थितांचे मन जिंकले.

आष्टी-चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ.नदीम शेख, प्रा.लक्ष्मण रेडेकर,पत्रकार मुजाहिद सय्यद,आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात गणेश उत्सव निमित्त गणेशोत्सव निमित्त आज मराठी डिजिटल माध्यमाच्या वतीने आष्टी शहरातील आठ तर कडा शहरात एक अशा नऊ शाळेत विविध स्पर्धा सुरू आहेत शनिवार (दि.14 संप्टेंबर) रोजी सकाळी 9 वाजता भव्य चित्रकला स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं होते.या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ.नदीम शेख,प्रा.लक्ष्मण रेडेकर,पत्रकार मुजाहिद सय्यद,आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत तब्बल 200 मुलींनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल असा
तनुजा राम पोकळे प्रथम,संस्कृती विष्णू पालवे द्वितीय,प्रीती साठे सतीश तृतीय या विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आबासाहेब खताळ,सतीष दळवी,विठ्ठल जगताप,शिवाजी आव्हाड,देवीदास शिंदे,संतोष खंडागळे,राजेंद्र शेळके,दत्तात्रेय गाडेकर,अप्पासाहेब काळे,बाळासाहेब भोसले,सुरेश नरोड,राजेंद्र लाड,आशा शिंदे,लतीका तरटे,जयश्री सोळंसे,आश्विनी धस,रुक्मिणी करपे,सुरेखा कुट्टे,उर्मिला गरजे, शाजिया बागवान,रोहीणी कारले,स्वाती टेकाडे,अर्चना धोंडे,मनिषा धोंडे आदीनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.