कुंडीमध्ये बाप्पाचे 107 भक्तांनी केले विसर्जन;नगर पंचायत घ्या आवाहनाला दिला आष्टीकरांनी प्रतिसाद
click2ashti update- अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आष्टीकरांनी पर्यावरणपूरक वातावरणामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन नगर पंचायत व धनश्री पतसंस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कुंडीत करत हिरवेगार वृक्ष घेऊन पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पर्यावरणपूरक श्री गणपती उत्सव व माझी वसुंधरा अभियानांतर्गत आष्टी नगर पंचायत आणि धनश्री पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने भाजी मंडई येथे मंगळवार (दि.17)रोजी सकाळी 10 वा.घरगुती गणपती विसर्जन करण्याकरिता भव्य विसर्जन कुंडाची निर्मिती करत या कुंडीचे सर्वप्रथम नगर पंचायतच्या मुख्याधिकारी ऋतुजा पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी नगरसेवक शमशोद्दीन शेख नगर पंचायतचे कार्यालयीन प्रमुख प्रकाश हरकळ,अभियंता गहिनीनाथ क्षिरसाठ,धनश्री पतसंस्थेचे सचिव जितेंद्र शिंदे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.या विसर्जन कुंडामध्ये नागरिकांनी आपल्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करत जवळपास शहरातील 107 भक्तांनी या कुंडलीमध्ये बप्पाचे विसर्जन केले आहे.तसेच विसर्जन करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना एक वृक्ष भेट म्हणून देण्यात आले आहे.भविष्यात प्रत्येक नागरिकांच्या घरासमोर एक वृक्ष असावे व उन्हाळ्यात नागरिकांच्या घरासमोर वृक्षाची सावली सुद्धा असेल व शहर हिरवेगार होईल ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी ऋतुजा पाटील यांनी सांगितले.