प्रशासनाची तयारी-जिल्हाधिकारी यांनी आष्टी विधानसभेच्या स्ट्राँग रुमची पाहणी करत दिल्या सुचना
click2ashti update-आष्टी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी कंबर कसली असून,या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघाची आयटीआय येथे असलेली स्ट्राँग रुम,इव्हीएम साठवणूक कक्ष व परिसराची पाहणी करत सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ते बदल करण्याच्या सुचना संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना दिल्या आहेत.

राज्यात लवकरच विधानसभेचे बिगुल वाजणार असून,त्याअनुषंगाने प्रशासनानेही कंबर कसली आहे.बुधवार (दि.१८)रोजी सायंकाळी ५ वा.बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेऊन,शहरातील एमआयडीसी भागात असणा-या आयटीआय इमारतीची पाहणी करून आवश्यक असलेले बदल करण्याच्या सुचना दिल्या.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे,आष्टी तहसिलदार वैशाली नेमगोंडा पाटील, पाटोदा तहसिलदार दत्तात्रय नेलवाडे,शिरुर कासार तहसिलदार शिवनाथ खेडकर,अप्पर पोलिस अधीक्षक कमलनाथ मिना,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव,आष्टी तहसिलचे निवडणूक नायब तहसिलदार शिवणकर,अव्वल कारकून राजाराम पवार यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.