उपचारासाठी पैसे नसल्याने आलेल्या नैराश्यातून गळफास घेऊन तरूणाने संपविले जीवन
आष्टी तालुक्यातील कडा येथील घटना
click2ashti update-गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी असल्याने आणि पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने आलेल्या नैराश्यातून व आजारपणाला कंटाळून ४३ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना गुरूवारी सकाळी सहाच्या दरम्यान कडा येथील सुंदरनगर परिसरात घडली.अशोक सुभाष वाडेकर वय वर्ष ४३असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील सुंदरनगर येथे राहत असलेले अशोक सुभाष वाडेकर वय वर्ष ४३ हे गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सर सारख्या गंभीर आजारांशी झुंज देत होते.तसेच पुढील उपचार घेण्यासाठी पैसे नसल्याने यातून आलेले नैराश्य आणि आजारपणाला कंटाळून गुरूवारी सकाळी सहाच्या दरम्यान राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना घडली.त्याच्या पाश्यात वडिल,पत्नी,भाऊ,दोन मुले,असा परिवार आहे.त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.