व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक

0

बीड click2ashti मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा अमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या शनिवार दि.२१ सप्टेंबर रोजी अखंड मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे.

आष्टी-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असा बंदचा फलक लावण्यात आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील एक वर्षांपासून घरदार सोडून लढा देत आहेत. मात्र प्रत्येक वेळी मंत्र्यांकडून वेळ मागवून घेतली जाते पण शब्द पाळला जात नाही. यामुळे आता पुन्हा सहाव्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतिम लढाई उपोषणाच्या माध्यमातून सुरू केली आहे. उपोषणाच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाजाच्या वतीने दि.२१ सप्टेंबर वार शनिवार रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. यात अत्यावश्यक सेवा यांना या बंदमधून वगळण्यात आलेले आहे. सर्व व्यापारी बांधवांनी आपआपले व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बंदच्या दिवशी संबधित तहसीलदार किंवा पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहेत. बीड तालुक्यातील सर्व मराठा सेवकांनी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी जमा होऊन निवेदन देण्यात येणार आहे. मराठा सेवकांनी हा बंद शांततेत पाळावा, असेही अवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.