आदित्य जीवने बीडचे नवे सीईओ
बीड click2news बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आदित्य जीवने यांची नियुक्ती झाली आहे. जीवने यांच्या बदलीचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत.
काही वर्षांपूर्वी जीवने हे माजलगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी म्हण्ून कार्यरत होते. प्रशिक्षणार्थी म्हण्ून जीवने यांनी बीड तहसीलदार, गटविकास अिधकारीपदावर काम केले आहे. यानंतर त्यांची गडचिरोली येथे बदली झाली. आज जीवने यांच्या बीड येथील नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले.यापूर्वी बीड जि.प.चे सीईओ म्हणून खडके यांची नियुक्ती झाली होती मात्र ते रुजू ना झाल्याने आता जिवने यांची बदली बीडला झाली आहे.