बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू
मुंबई click2news बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी अटक केली होती.
आज सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस ठाण्याकडे जात होते. यावेळी अक्षय याने संरक्षणासाठी असलेल्या पोलिसाकडील बंदूक घेऊन पोलिसावरच गोळीबार केला. यावेळी प्रत्युतरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. तर एपीआय नीलेश मोरे यांना गोळी लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.