मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची पेटविली
छत्रपती संभाजीनगर click2news मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार वारंवार दुर्लक्ष करत आहे. जरांगे यांनी पुन्हा अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने संतप्त मराठा आंदोलकांनी आज मंगळवारी फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर) येथील तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिल्याची घटना घडली.
अंतरवली सराटी येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज उपोषणाचा आठवा दिवस असून राज्यभरातून मराठा बांधव आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. मात्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी ठोस निर्णय घेत नसून जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त मराठा आंदोलकांनी आज फुलंब्री तहसीलदारांची खुर्ची जाळली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.