कार अपघातात दावनेंची कन्या थोडक्यात बचावली
छत्रपती संभाजीनगर click2ashti चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ झालेल्या माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या थोडक्यात बचावल्या. हा अपघात आज सोमवारी सकाळी घडला.
संजना जाधव या कार्यकर्त्यांसमवेत बनोटी (ता.कन्नड) येथे कारने जात होत्या. चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ त्यांची कार आली असता समोरुन येणाऱ्या पीकअपने जाधव यांच्या कारला समोरुन धडक दिली. या अपघातात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्यासह सहकारी थोडक्यात बचावले.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांनी पळून जाणाऱ्या पिकअपला अडवत चालकाला पकडले. पिकअप चालक नशेत गाडी चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.