मविआचा जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय
मुंबई click2ashti महाविकास आघाडीचे जागा वाटपावर चर्चा सुरु असून लवकरच याबाबत निर्णय होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
विधानसभा निवडणूका दोन महिन्यांवर आल्या असून अजुनही राजकीय पक्षांकडून जागा वाटप करण्यात आल्या नाही. या उलटल मनसेने काही ठिकाणी उमेदवारही जाहिर केले आहेत. महायुतीमध्ये बाशींग बांधून असलेले नाराज आमदार ऐनवेळी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करुन आपली उमेदवारी फिक्स करतील अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान महायुतीकडून अजुनही जागा वाटपाबाबत निर्णय झाला नाही. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांची फेरी सुरू झाली असून घटक पक्षांचीही आजही बैठक सुरु असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. येत्या दोन, चार दिवसात जागा वाटपाबाबत निर्णय होईल असेही त्या म्हणाल्या.