व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी व शिरूर भागात घरफोडी करणा-या टोळीचा पर्दाफाश,स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी

0

आष्टी-आष्टी व शिरूर कासार भागात घरफोडी करणारी टोळी अनेक दिवसांपासून गुंगारा देत होती.अखेर या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून,या टोळीच्या मोहरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.या कामगीरीमुळे स्थानिक गुन्हेशाखेचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी शहरातील मुर्शदपूर भागात दिनांक 17/12/2022 रोजी रात्री 02.45 वा. चे सुमारास फिर्यादी अविनाश नानासाहेब पवळ वय 42 वर्षे व्यवसाय डॉक्टर (रा. मुर्शदपुर ता.आष्टी) हे घरामध्ये झोपलेले असताना दरवाजाची कडी कोंडा तोडुन अनोळखी चार चोरटयाने घरामध्ये प्रवेश करुन काठीचा धाक दाखवुन सोने व रोख रक्कम चोरी करुन घेऊन गेले आहे केली आहे वगैरे मजकुराचे फिर्यादवरून पो.स्टे.आष्टी गुरनं 414/2022 क. 392,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरची बाब गंभीरतेने घेवून मा.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वरील घटनेतील आरोपींना तात्काळ जेरबंद करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.सदर गुन्हयाचे अनुषंगाने पो.नि.स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथकाने घटनास्थळी भेट देवून आरोपी व गेलेमालाचा शोध घेत असतांना मा.पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा 1) निबांळकर आसाराम भोसले रा.चिंचोडी पाटील ता.जि.अहमदनगर यांनी त्याचे साथीदारसह केला आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाले वरुन दिनांक 27/12/2022 रोजी सदर आरोपीस चिचोडी पाटील येथून ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर तीन साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.तसेच पोलीस ठाणे शिरुर हददीमध्ये मागिल दोन महिण्यापुर्वी मानुर शिवारात सिध्देश्वर वस्तीवर व सिरसाट वस्तीवर मारहाण करुन चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर पो.स्टेला गु.र.न 150 / 2022 कलम 394,34 भादवि व गु.र.न 158/2022 कलम 394,323,34 भादवि प्रमाणे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी कडुन एकुण (3) गुन्हे उघडकिस आले आहेत. तसेच इतर जिल्हयातील देखील गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.सदर आरोपी नामे निबांळकर आसाराम भोसले रा. चिंचोडी पाटील ता.जि.अहमदनगर यास पो.स्टे. आष्टी 414 / 2022 कलम 392,34 भादंवि चे तपासकामी पो.स्टे.आष्टी यांचे ताब्यात दिले आहे.पुढील तपास पो.स्टे.आष्टी व स्था.गु.शा.चे पथक करीत आहे. आरोपीतांकडुन अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरिक्षक सतिष वाघ,पोउपनि भगतसिंग दुलत,पोह मनोज वाघ,प्रसाद कदम, रामदास तादंळे,पोना-सोमनाथ गायकवाड,विकास वाघमारे,विकी सुरवसे,अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.