राज्यातील लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार : अजित पवार
बीड click2ashti राज्यातील आमच्या भगिनींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत भाऊबीजेला लाडक्या बहिणींना ओवाळणी देणार असून हा दादाचा वाद आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
माजलगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की,रक्षाबंधनला जसे 3 हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेला माझ्या लाडक्या बहिणींना मी रिकाम्या हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार हा माझा वादा आहे, असा विश्वास अजित पवारांनी दिला आहे. आम्ही दिलेल्या योजना पाच वर्षे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला घड्याळ या चिन्हाला मतदान करावे लागेल, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.