व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शेतक-यांसाठी होत असलेले कृषी प्रशिक्षण केंद्राचे काम दर्जेदार करावे-आ.बाळासाहेब आजबे

0

आष्टी click2ashti-आष्टी मतदार संघातील आष्टी,पाटोदा, शिरूर या तिन्ही कृषी विभागाच्या इमारती नव्हत्या त्या आपण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतल्या आहेत.आता आपल्या आष्टी तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या वतीने होत असलेले शेतकरी प्रशिक्षण केंद्राने फायदा होईल.पण संबंधित गुत्तेदाराने या इमारतीचे दर्जेदार काम करावे अशा सुचनाही आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिल्या आहेत.

आष्टी-तालुक्यातील प्रशिक्षण केंद्राच्या भुमिपुजन प्रसंगी बोलतांना आ.आजबे दिसत आहेत.

कृषी विभागाच्यावतीने आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून एक कोटी रूपायाचे कृषी प्रशिक्षण इमारतीचे भुमीपुजन गुरूवार (दि.३)रोजी दुपारी १२ वा.आ.आजबे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी जिल्हाकृषी अधिक्षक बाबासाहेब जेजूरकर,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.मधुकर हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे,युवानेते यश आजबे,महेश आजबे,जलसंपदा विभागाचे अधिकारी जाधवड,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

499/-च्या खरेदीवर जिंका पैठणी आजच भेट द्या…

पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,जलसंपदा विभागाच्या वतीने हे प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले आणि हे कुठे करायचा हा निर्णय मी कृषी कार्यालयात बांधण्याचे ठरविले.या कृषी प्रशिक्षण केंद्राने शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.मतदार संघातील तिन्ही तालुक्यात आपण तालुका कृषी कार्यालय पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.आपल्या भागात अतिवृष्टी झालेली नाही.अजूनही आपल्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे.अजूनही पावसाची शक्यता आहे.त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने शेतक-यांनी येथून मोठ्या प्रमाणावर फायदा घ्यावा असे आवाहनही आ.आजबे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कृषी अधीक्षक जेजूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना गोरख तरटे म्हणाले, आष्टी तालुक्यात शेती मोठ्या प्रमाणावर असून,आपल्या शेतक-यांना शेती विषयक माहिती आणि प्रशिक्षण मिळविण्यास मदत होते.आपल्या तालुक्यात ड्रॅगन फ्रुट,सफरचंद,स्टाॅबेरी यासारखे पिके येथे घेतले आहेत.त्यामुळे हे प्रशिक्षण केंद्र झाल्यावर नक्कीच तालुक्याला फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आष्टी-तालुक्यातील प्रशिक्षण केंद्राच्या भुमिपुजन प्रसंगी बोलतांना आ.आजबे दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.