व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

घनश्याम दरवडे चित्रपटात झळकणार

0

मुंबई click2ashti राज्यभरात छोटा पुढारी म्हण्ून ख्याती असलेला घनश्याम दरवडे मराठी िबगबॉसमधुन पुन्हा एकदा चर्चेत आला. आता घनश्याम लवकरच चित्रपटात झळकणार आहे. कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटात तो महत्वाची भूिमका निभावणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आिण सांगोला मतदारसंघाचे आमदार स्व.गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर लवकरच कर्मयोगी आबासाहेब हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आमदार गणपतराव देशमुख हे तब्बल ११ वेळा सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आपल्या ५५ वर्षांच्या राजकीय जीवनात गणपतराव देशमुख यांनी अनेक महत्वाची कामे केली आहेत. साधी राहणीमान हा त्यांचा विशेष गुण होता. राज्याच्या राजकारणात त्यांना मोठा सन्मान होता. सलग ११ वर्षे देशमुख आमदार म्हणून निवडून आले ते त्यांच्या राजकारण आिण समाजकारणातील महत्वाच्या कामांमुळे आिण सांगोला मतदारांनीही त्यांच्यावर भरभरुन प्रेम दिले. यामुळे त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकणारा कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात छोटा पुढारी म्हण्ून ख्याती असलेला घनश्याम दरवडे छळकणार आहे. तो नेमका कोणत्या भूमिकेत झळकणार आहे हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. दरम्यान चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केले आहे. मायका माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने याची निर्मिती करण्यात आली आहे. संगीत अवधूत गुप्ते यांनी दिले आहे. या चित्रपटात त्यांचा आवडता स्पर्धक घनश्याम दरवडे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.