व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ… पहा किती झाली वाढ

0

मुंबई click2ashti इतर मागास बहुजन कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे आता योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या शिष्यवृत्तीत तिपटीने वाढ झाली आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 5 वी 10 मधील विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 60 रुपये वरुन 250 प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे. विभाभज , विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरुपात दिली जाणारी 100 रुपयांची रक्कम ही 300 रुपये प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.