सोमवारी बेलगाव येथे माजी मंत्री सुरेश धस यांच्या हस्ते १२ कोटी ३१ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचे भुमिपुजन व लोकार्पण सोहळा
आष्टी click2ashti-तालुक्यातील बेलगाव येथील माजीमंत्री सुरेश धस suresh dhas यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर असलेल्या १२ कोटी ३१ लक्ष रुपयांच्या उद्या सोमवार दि.०७ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९ वा.माजीमंत्री सुरेश धस यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रेणुकमाता मंदिर समोर होणार असून या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ बेलगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुकामाता मंदिरासाठी माजीमंत्री सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नाने आत्तापर्यंतचा सर्वात जास्त ४ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी देवस्थानच्या विकासासाठी आणला असल्याने त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी श्री.क्षेत्र रेणुकामाता देवस्थानसाठी ०४ कोटी ९० लक्ष रुपये,रा.मा ७० ते बेलगाव मांडवा रस्ता यासाठी ०३ कोटी रुपये,जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा सोय करणे ६६ लक्ष रुपये, MREGS अंर्तगत जि.प. प्राथमिक शाळा कंपाउंड वॉल बांधकाम करणे ०१ कोटी रुपये,ग्रामपंचायत भवन बांधकाम करणे ३५ लक्ष रुपये,विठ्ठल रुख्मिणी मंदिर,लक्ष्मी माता मंदिर laxmi mata व रेणुका माता मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसवणे ३० लक्ष रुपये,स्मशानभूमी अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हिंग ब्लॉक ३० लक्ष रुपये,MREGS अंर्तगत रस्ता मजबुती करण करणे १.५ कोटी रुपये, रेणुका माता मंदिर परिसर सुशोभीकरण १० लक्ष रुपये,शिंदे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नळकांडी पुल बांधकाम करणे १० लक्ष रुपये,दलित वस्ती मध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे १० लक्ष रुपये,अहिल्यादेवी होळकर योजने अंतर्गत धनगर समाजासाठी ४० घरकुल मंजुरी,रमाबाई घरकुल योजने अंतर्गत २६ घरकुल मंजुरी या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माजीमंत्री सुरेश धस यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी Ad.sahebrav mahske अँड.साहेबराव म्हस्के असणार आहेत.पंचक्रोशीतील नागरिकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बेलगांव belgov समस्त ग्रामस्थांनी केले आहे.