व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मतीमंद व मुकबधीर मुलींवर बलात्कार,आरोपीं दोन तासांत गजाआड;अंभोरा पोलिसांची कारवाई

अंभोरा पोलीसांनी स्वतःफिर्यादी होवुन मुकबधीर व मतीमंद मुलीवर झालेल्या लैगिंक अत्याचाराबाबत दाखविलेली संवेदशिलता

0

आष्टी click2ashti-तालुक्यातील अंभोरा पोलिस हद्दीतील एका गावातील 25 वर्षीय मुकबधीर, मतीमंद मुलीवर चार मुलांनी बलात्कार केला असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना फोनद्वारे मिळतात स्वतःठाण्याचे प्रमुख मंगेश साळवे यांनी दखल घेत.पिडीत महिलेस ठाण्यात आणत तक्रार देण्यास लाऊन सदरील घटनेतील चार आरोपींच्या दोन तासांत अंभोरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

जाहिरात

याबाबत अंभोरा पोलिसांकडून अधिक मिळालेली माहिती अशी,पोलीस स्टेशन अंभोरा येथे दि.04.00.2024 रोजी फोनव्दारे माहिती मिळाली पोलीस स्टेशन अंभोरा हद्दीतील एका गावातील 25 वर्षीय मुकबधीर,मतीमंद मुलीवर चार मुलांनी बलात्कार केला आहे.त्याप्रमाणे तात्काळ सदर ठिकाणी मंगेश साळवे यांनी श्रेणी पोउपनि देविदास सातव,पोलीस अंमलदार सुदाम पोकळे यांना घटनास्थळी पाठविले असता त्यांनी पिडीत 25 वर्षीय मुकबधीर,मतीमंद (अ.ब.क) हिस तिचे आई-वडीला यांचे सह पोलीस स्टेशन अंभोरा येथे घेवुन येवुन घडलेल्या घटनेची त्यांना तक्रार नोंदविणे बाबत सांगितले असता, पिडीतेच्या आई-वडीलांना घडलेल्या घटनेअनुशंगाने तक्रार देण्यास नकार दिला.सदरची माहिती सपोनि साळवे यांनी मा. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी कमलेश मिना साहेब यांना दिली. त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर पिडीतेची तात्काळ बलात्काराच्या अनुशंगाने वैदयकीय तपासणी करुन सरकार तर्फे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक देविदास सातव यांचे फिर्यादी होवुन पोलीस स्टेशन अंभोरा गुरन-246/2024 कलम-64(2) (आय) (जे),70 भारतीय न्याय संहिते प्रमाणे चार आरोपीतां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच सदरचा गुन्हा अत्यंत संवेदनशिल व गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणे करीता सपोनि मंगेश साळवे, पोउपनि देविदास सातव,पोलीस हवालदार, मुकूंद एकशिंगे,बाबुराव तांदळे, भरत माने, संतोष राठोड, मनोज खंडागळे, महिला पोलीस हवालदार छाया साप्ते, पोलीस नाईक अमोल ढवळे,प्रशांत कांबळे,पोलीस अंमलदार शिवदास केदार,सतिष पैठणे, अमोल सिरसाट,सुदाम पोकळे,चालक पडवळ यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन दोन आरोपींना गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले आहे.

499/- च्या खरेदीवर जिंका पैठणी

तसेच उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध घेणे कामी सपोनि मंगेश साळवे साहेब व पाच अंमलदार यांचे विशेष पथक नेमण्यात आले असता सदर पथकाने उर्वरित दोन आरोपींना देखील आज दुपारी 3 वा.चे सुमारास ताब्यात घेतले असुन नमुद गुन्हयातील चारही आरोपीतांना अटक करण्याची प्रक्रिया चालु आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास संभाजी तागड सहा-पोलीस निरीक्षक नेम-पिंक मोबाईल पथक आष्टी हे करीत आहेत.
अंभोरा पोलिसांचे काम कौतुकास्पद
सदर घटनेमध्ये कोणीही फिर्यादी नसतांना अंभोरा पोलीसांनी स्वतः फिर्यादी होवुन मुकबधीर व मतीमंद मुलीवर झालेल्या लैगिंक अत्याचाराबाबत दाखविलेली संवेदशिलता तसेच तत्परता वाखण्याजोगी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.