आष्टीचे नवे पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हानपुडे यांनी स्वीकारला पदभार
आष्टी click2ashti-येथील पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांची पालघर येथे बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नांदेड जिल्ह्यातून पोलीस उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण हानपुडे यांची आष्टी येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

आष्टी पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून तीन वर्षे योग्य पद्धतीने यशस्वीरित्या कामकाज करून कार्यकाळ संपल्यानंतर आष्टी येथून पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांची पालघर येथे बदली करण्यात आली.रिक्त झालेल्या जागेवर आता नांदेड जिल्ह्यातून पोलीस उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण हानपुडे यांची आता नव्याने आष्टी येथे नेमणूक करण्यात आली.त्यांनी सोमवार (दि.७) रोजी आपल्या पदाचा कारभार स्वीकारला आहे.