व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

गरबा खेळताना आला हार्टअटॅक

0

पुणे click2ashti सध्या नवरात्र सुरु असल्याने सर्वत्र गरबाची रंगत वाढली आहे. मात्र गरबा खेळण्याचा आनंद घेताना हार्टअटॅक आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील चाकण परिसरात घडली.
अशोक माळी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गरबा किंग म्हण्ून ते सर्वत्र परिचित आहेत. त्यांचा गरबा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. चाकण परिसरात काल गरबा खेळण्यात अशोक माळी मग्न होते. विशेष म्हणजे ते आपल्या लहान मुलासोबत गरबा खेळत असताना भोवळ येऊन ते खाली पडले. थोडावेळ लोकांना काही कळेनासे झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.