बीड जिल्ह्यातील आमदार शरद पवारांच्या संपर्कात
बीड click2ashti आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे इनकमिंग वाढली असून बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचा एक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी सध्या शरद पवार यांच्याशी जवळकी साधली असून काही दिवसांपूर्वी त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका मांडली होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बॅनरवरुन भाजपचे पक्ष चिन्ह आिण नाव दिसेनासे झाले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी आमदार पवार यांनी शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याची भेट घेतल्याचीही चर्चा आहेे.