तुळजापूर येथे निघालेल्या पलंगाचे आष्टीत जल्लोषात स्वागत
'आईराजा उदो उदो,सदानंदाचा उदो उदो..., बोल तुळजाभवानी माता की जय...' शहर दणाणले
आष्टी click2ashti-शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त आहिल्या नगरहून श्रीक्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या मानाच्या तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे आगमन बुधवारी (९ ऑक्टोबर) सकाळी सातव्या माळेला आष्टी शहरात उत्सहात झाले.यावेळी पलंगाचे परंपरेचे असलेले मानकरी एकशिंगे कुटुंबीयांकडून पलंगाचे उत्साहात भक्तिभावाने स्वागत व पूजन करण्यात आले.पुष्पहार अर्पण करून पलंगाची विधिवत पूजा व आरती केली.यावेळी दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी ‘आईराजा उदो उदो,सदानंदाचा उदो उदो…,बोल तुळजाभवानी माता की जय…’असा जयघोष केला.
गेल्या 800 वर्षापूर्वीची यादव कालीन परंपरा असलेल्या या देवीचा पलंग साग,आंब्याचे लाकूड या आधारे तयार करण्यात येतो.या पलंगाचे पाचव्या माळीला तुळजापूरकडे प्रस्थान सुरु होते.बु-हानगर आहिल्यनगर, चिचोंडी,पुंडी,वाहिरा,खुंटेफळ,लोणी loni,कडा,जळगांव,कारखाना,आष्टी,जामखेड jamkhed,तुळजापूर असा या पलंगाचा प्रवास असतो.अहमदनगर येथील बाबूराव पलंगे,गणेश पलंगे हे या पलंगाचे मालक आहेत.भाद्रपद पौर्णिमेला हा पलंग मार्गस्थ होतो.आष्टी शहरात या पलंगाचे आगमन आज बुधवार (दि.९) रोजी आगमन झाले.शहरातील कसबा पेठेत हरिभाऊ एकशिंगे,अशोक एकशिंगे,देविदास एकशिंगे यांच्या निवासस्थानी या पलंगाचे स्वागत झाल्यानंतर तो दर्शनासाठी उभा केला.एकशिंगे कुटुंबियांची ही आठवी पिढी आहे.प्रत्येक ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते.घटस्थापनेच्या सातव्या माळेला सकाळी सातच्या वाजण्याच्या सुमारास आष्टी शहरात हा देवीचा पलंग पोहचतो.नंतर जामखेड मार्गे तुळजापुरला दस-याच्या पूर्वसंध्येला तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पोहचत असल्याची माहिती पलंंगाचे चालक पलंगे यांनी दिली.तुळजापुरला पलंग पोहचल्यानंतर विजयादशमी ते कोजागीरी पौर्णिमे पर्यंत या पलंगावर तुळजाभवानी माता निद्रा घेते अशी अख्यायिका आहे.नंतर हा पलंग होम मध्ये विसर्जीत केला जातो.