व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आपल्या माणसाला टार्गेट केल्यावर ते कसे हाणून पाडायचे हे परळीकरांना चांगले माहिती आहे : धनंजय मुंडे

0

परळी click2ashti ज्यांचा आम्ही आदर करतो ते माझ्यावर टीका करतात परंतु vआपल्या माणसाला टार्गेट केल्यावर त्यांचा डाव कसा हाणून पाडायचा हे माझ्या मायबाप परळी येथील जनतेला चांगली माहित आहे असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
परळी विधानसभा मतदारसंघातील एक हजार कर्णबधीर दिव्यांग बांधवांना, अद्ययावत मशीनवाटप कार्यक्रम सोमवारी झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय मी घेतला. मी कायम विरोधकांवर टीका केली. मात्र ज्यांचा आम्ही आजही आदर करतो त्यांचे विरोधात कधीही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही मात्र मला प्रत्येक वेळी टार्गेट केले जात आहे. वैयक्तिक माझ्या विरोधात बोलले जात आहे परंतु परळीची जनता या टार्गेटला उत्तर देईल असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.