व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पहाटेपासून मराठ्यांची नारायण गडाकडे कुच

दसरा मेळाव्याला दहा लाखाहून अधिक मराठा बांधव येणार

0

बीड click2ashti अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या श्री क्षेत्र नारायण गडावरील दसरा मेळाव्यासाठी पहाटेपासून मराठ्यांनी नारायण गडाकडे कूच केली आहे. बीड सह राज्यभरातून दहा लाखांहून अधिक मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहुन पुन्हा एकदा मराठ्यांची ताकद दाखविणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून लढा देत आहेत. राज्यभर दौरे आणि उपोषणाच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज श्री क्षेत्र नारायण गड येथे भव्य दसरा मेळावा होत आहे. 900 एकर मध्ये दसरा मेळावा होणार असून दोनशे एकर मध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांचे आगमन झाल्यावर 51 जेसीबी द्वारे त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात येणार आहे. महंत शिवाजी महाराज व गडावरीलनगद नारायण महाराज यांच्या समाधीचे जरांगे पाटील दर्शन घेतील. त्यानंतर गडावरून मेळाव्याच्या स्टेजपर्यंत मिरवणूक काढली जाईल. 500 क्विंटल बुंदीच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी पहाटेपासून मराठे नारायण गडाकडे कूच करत आहेत. राज्याभरातून जवळपास दहा लाखांहून अधिक मराठा समाज बांधव मेळाव्यासाठी उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.