जि.प.मध्ये दर्जेदार शिक्षण सुविधा मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी पुणे जिल्ह्यामध्ये स्थिरावले आहेत-सुरेश धस
मतदारसंघाप्रमाणेच पुण्यातही नागरिकांची गर्दी तर सर्वत्र धसांचे जंगी स्वागत
पुणे click2ashti-आष्टी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न घेऊन आपण राजकारणात आलो सरपंच मनापासून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे लक्ष देऊन दर्जेदार शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे तात्कालीन पहिली ते सातवीतील असलेले विद्यार्थी आज पुणे जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रात स्थिरावले आहेत याचा आपणास अभिमान वाटत असून त्यांच्यासाठी काही करता आले याची समाधान वाटत आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी केले.
आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या वाकड,रूपीनगर,हडपसर आणि रांजणगाव येथे रविवार (दि.२०)रोजी आयोजित कौटुंबिक स्नेह मेळाव्यामध्ये ते बोलत होते.पुढे बोलताना धस म्हणाले की,पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आपल्याकडील लोक कार्यरत आहेत आयटी क्षेत्रात असतील व्यावसायिक क्षेत्रात असतील ड्रायव्हर क्षेत्रात देखील आपल्या भागातील मुले बहुसंख्येने आहेत जे की स्वतःची वाहने घेऊन या क्षेत्रात आलेली आहेत 1999 पासून आज पर्यंत गोरगरिबांची शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत असलेल्या घेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे दर्जेदार मिळावे यासाठी शैक्षणिक कार्यावर भर देत आलेलो आहे. ज्यावेळेस मी पहिल्यांदा जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो त्यावेळेस शिक्षकांचा तुटवडा आणि असलेल्या रिक्त जागा मला जाणवत होत्या त्यात तात्काळ भरण्यासाठी मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असल्याने तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी मला या निर्णयासाठी सर्वाधिकार दिले आणि त्यावेळेस एक हजार शिक्षकांची मेगा भरती करण्याचे काम पहिल्यांदा मी केलं 2001 ते 2005 पर्यंत ही रमणी पॅटर्न लागू केला 30 टक्के गुणवत्ता असलेल्या शाळा त्या 2005 साली 68.60% पर्यंत गेल्या आणि याच कालावधीमध्ये असलेले पहिले ते सातवी वर्गातील मुलं आज आपल्याला पुणे जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहेत.
माझ्या मतदारसंघातील जरेवाडी ची 30 विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळा आज 1300 विद्यार्थ्यांची झालेली आहे.आज त्या शाळेत विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला वेटिंग आहे शिवाय कोतन येथील शाळा देखील त्याच धर्तीवर मार्गक्रमण करत आहे.त्या ठिकाणचे मिसाळ नावाचे शिक्षक तर जरेवाडी चे संदीप पवार हे शिक्षक गुणवत्ता वाढीचे प्रामाणिकपणे काम करत आहेत अशा शिक्षकांची आज प्रामुख्याने गरज आहे. माझ्या कार्यकाळात जिल्हा परिषद शाळेच्या खुल्या असतील अंगणवाडी खुले असतील त्याला भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे काम मी प्रामाणिक केले मात्र 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 या दहा वर्षाच्या कार्यकाळात दोन लोकप्रतिनिधी यांच्या कार्यकाळात 784 शाळा खोल्या या कमी असून 450 ते 500 अंगणवाड्या खोल्या देखील उपलब्ध करून शकले नाहीत हे विदारक चित्र आज मतदारसंघाचे आहे.दहा वर्षात हे दोन्ही आजी-माजी लोकप्रतिनिधी कधी कोणाच्या सुखदुःखात दिसले नाहीत.परंतु माझे संपूर्ण कुटुंब मी माझे भाऊ देविदास आबा माझा पुतण्या श्याम माझा मुलगा जयदत्त दुसरा मुलगा सागर हे नेहमी 24 तास जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम प्रामाणिकपणे करतो. 2004 ते 2009 या कालावधीत सेना मेहेकरीचे काम हाती घेतले 2009 ते 2014 या कालावधीत हे काम जवळपास 97% पूर्ण करण्याचे काम मी केले.खुंटेफळ साठवण तलाव करताना विरोधकांचे दगडं अंगावर घेतले परंतु तसूभरही मागे हटलो नाही असे सांगत गोदावरी खोरे,मांजरा खोरे,सिंदफणा खोरे यामध्ये जायकवाडी खोऱ्यातून उपलब्ध होणारे 58 टीमसी येणारे पाणी आगामी काळात पाटोदा,शिरूर कासार तालुक्यातील सतत दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी,सिंचनासाठी उपलब्ध करून देणारच आहे असा दुर्दम्य विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.यावेळी नगरसेवक शांताराम भालेकर,हिंजवडीचे सरपंच दत्ता साखरे,माझी सभापती सुरेश हुळवले,मल्हारी साखरे,कासार साई चे सरपंच ललित शिंदे नगरसेवक गोपाळ माळेकर,नगरसेवक बाबा त्रिभुवन माजी सभापती प्रमिलाताई सगळे,उद्योजक बंडूशेठ तोडकर उद्योजक शहादेव चौधरी,सतीश कंठाळे,बापू तांबे,कुमार कोकणे,गणेश कदम,दीपक गुंड,राजू वलवळे,अनिल टेकाळे,सोमीनाथ मंडलिक,बापू तांबे,स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड मुकादम संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप,हडपसर नगरसेविका उज्वला जंगले,सुभाष जंगले,सोमनाथ जराड या कार्यक्रमाचे नियोजन उद्योजक अनिल टेकाळे,राजेंद्रजी वलवळे,विनोद शिंदे,दीपक गुंड,कुमार कोकने,शकर जरांगे,कृष्णा बांगर,राजू चखाले,चिंचोली सरपंच मारुती सांगळे,गणपत जगताप,हिरामण बुचुडे,युवा नेते जय साखरे,विकास एकशिंगे,गणेश कदम,सर्जेराव कचरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मतदारसंघाप्रमाणेच पुण्यातही नागरिकांची गर्दी तर सर्वत्र धसांचे जंगी स्वागत
वाकड,रूपीनगर,हडपसर आणि रांजणगाव या ठिकाणी झालेल्या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात सुरेश धस यांचे जोरदार स्वागत करण्यात आले वाकड येथे हलगी पथकाचा आवाज घुमला तर हडपसर व रांजणगाव येथे मतदार संघातील उपस्थित नागरिकांनी धस यांच्यावर पुष्पवृष्टी केली.