भीमराव धोंडेंकडे ३६ कोटींची संपत्ती; पाच वर्षांमध्ये २ कोटी ५९ लाखांची वाढ
आष्टी विधानसभा मतदारसंघातून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
आष्टी click2ashti-आष्टी विधानसभा मतदार संघातून माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.त्यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेशाचीही चर्चा होती.अद्याप त्यांना भाजप किंवा राष्ट्रवादी पवार गट या दोन्हींकडून उमदेवारी मिळालेली नाही.मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या धोंडे यांनी बुधवार (दि.२३) अपक्ष उमेवादवारी अर्ज दाखल केला आहे.
बुधवारी माजी आमदार भीमराव धोंडेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.दरम्यान,त्यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनूसार मागील पाच वर्षांत त्यांच्या चल आणि अचल संपत्तीत २ कोटी ५९ लाख ८२ हजार ३९१ रुपयांची वाढ झाली आहे.त्यांच्याकडे धोंडे, त्यांच्या पत्नी व एकत्रित कुटुंब मिळून त्यांच्याकडे एकूण ३६ कोटी ४० लाख ९१ हजार ९४३ रुपयांची संपत्ती झाली आहे.
धोंडे यांच्याकडे ३ कोटी ४१ लाख ४३ हजार ७०९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीकडे २ कोटी ४५ लाख ११ हजार ९३९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या एकत्रित कुटुंबाकडे २ कोटी ४५ लाख ६० हजार २२३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.तर,धोंडे यांच्याकडे ६ कोटी ८३ लाख ९ हजार २४७ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नीकडे १९ कोटी २० लाख ९५ हजार ५१४ रुपयांची तर एकत्रित कुटुंबाकडे २ कोटी लाख ७१ हजार ३११ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.एकूण ३६ कोटी ४० लाख ९१ हजार ९४३ रुपयांची त्यांची मालमत्ता आहे.