आष्टी मतदारसंघ महायुतीकडून गॅसवरच;अजित पवार यांची दुसरी यादी जाहीर
आष्टी click2ashti-अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना यंदा अनुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.सुनील तटकरे यांनी या नावांची घोषणा केली.तर आष्टी मतदार संघ महायुतीकडून अद्यापही अजित पवार गटाने जाहिर न केल्याने येथील महायुतीचे दावेदार असलेले आजी-माजी आमदार गॅसवरच असल्याचे दिसत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यांदी पुढील प्रमाणे-
1.झिशान सिद्दीकी -वांद्रे पूर्व
2.निशिकांत पाटील -इस्लामपूर
3.संजयकाका पाटील -तासगाव
4.प्रताप चिखलीकर-लोहा कंधार
5.सुनील टिंगरे -वडगाव शेरी
6.ज्ञानेश्वर कटके -शिरुर हवेली
7.सना मलिक -अनुशक्तीनगर
हे उमेदवार जाहिर केले आहेत.