आष्टी तालुका पत्रकार संघाच्या वतीने खासदार बजरंग सोनवणे यांचा जाहिर निषेध
आष्टी click2ashti-बीड लोकसभा मतदारसंघातील खासदार बजरंग सोनवणे यांची विधानसभा निवडणुकीनंतर बोलतात जीभ घसरली आहे.एका पत्रकाराने लावलेल्या बातमीचा उल्लेख करत बजरंग सोनवणे यांनी थेट पत्रकाराच्या बायकोचा आणि मुलाचा उल्लेख केला. माझ्यावर तुझ्या बायकोला किंवा पोराला संशय आला का? असे म्हणत सोनवणे यांनी पत्रकारितेला लोकसभेचा चौथा स्तंभ ठरवले आहे.त्यांनी लावलेल्या या जावई शोधावर देखील आता मतदारसंघातून टीका होत असून,आष्टी तालुका पत्रकार संघाच्या वतीने खासदार बजरंग सोनवणे यांचा जाहिर निषेध करण्यात आला आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.मराठा विरुद्ध ओबीसी अशा या लढतीत बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवत थेट लोकसभेत प्रवेश केला.मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तेवढे सक्रिय दिसले नाही. या संदर्भात एका पत्रकाराने बातमी केली होती. या बातमी विषयी बोलताना बजरंग सोनवणे यांनी थेट पत्रकाराच्या बायकोचा आणि मुलाचा उल्लेख करत टीका केली.त्यामुळे खासदार सोनवणे यांच्या वक्तव्याचा आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे,उत्तम बोडखे,दत्ता काकडे, भिमराव गुरव,प्रा.डाॅ.विनोद ढोबळे,शरद तळेकर,रघुनाथ कर्डिले, संतोष सानप,शरद रेडेकर,सचिन रानडे,मनोज पोकळे,गणेश दळवी यांच्यासह आदि पत्रकारांनी निषेध केला आहे.
नेमके काय म्हणाले बजरंग सोनवणे
या संदर्भात बोलताना बजरंग सोनवणे यांनी विधानसभा निकालानंतर एका बातमीवर संशय व्यक्त केला आहे.एक बातमी एका पत्रकाराने प्रसिद्ध केली होती. यामध्ये बजरंग सोनवणे हे सक्रिय नसल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता.मात्र हा संशय कोणाला आला? तुला,तुझ्या बायकोला की तुझ्या मुलाला?असे त्यांनी म्हटले आहे.एवढेच नाही तर पत्रकारिता हा लोकसभेचा चौथा आधारस्तंभ असल्याचा जावई शोध देखील त्यांनी लावला.इतकेच नाही तर पत्रकारांनी सत्याच्या बाजूने बातमी करावी,असा सल्ला देखील त्यांनी दिला.