संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड चा तातडीने शोध घ्यावा आ.सुरेश धस यांची मागणी
आष्टी click2ashti-केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे भरदुपारी राजरोसपणे राज्य रस्त्यावर अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे अत्यंत गंभीर असून या घटनेचा सखोल तपास करून या घटनेतील मास्टर माईंड कोण आहे? याचा छडा पोलिसांनी लावला पाहिजे असे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त करत केजची घटना अंत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना आ.धस म्हणाले की,केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली.एखाद्या गावच्या प्रथम नागरिक असलेल्या व्यक्तीचे अपहरण होते त्यानंतर त्याची हत्या करण्यात येते ही अत्यंत निंदनीय बाब असून या घटनेतील जे कोणी मुख्य आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे.शिवाय या घटनेच्या मागे नेमके मास्टर माईंड कोण आहेत? कारण भर दिवसा हत्या करण्याचे धाडस या आरोपींनी केले आहे त्यामध्ये निश्चितपणे कोणीतरी बडीशक्ती असावी त्यामुळे याबाबतचा तपास देखील पोलिसांनी करण्याची मागणी आ.धस यांनी केली आहे.