जागा मालकाच्या उपोषण आंदोलनामुळे भारतीय स्टेट बॅकेचे शाखाधिकारी नरमले..!
आष्टी click2ashti-आष्टी येथील भारतीय स्टेट बँक शाखेचे स्थलांतर होऊनही जागेचा ताबा आणि भाड्याच्या फरकाची रक्कम न देता जागा मालकांने शाखाधिकार्या विरुद्ध जागा मालक बंधूंनी उपोषण आंदोलन केल्यामुळे जागेचा ताबा देऊन शाखाधिकाऱ्याला सपशेल नरमाईची भूमिका घ्यावी लागली.
याविषयी अधिक माहिती अशी,आष्टी येथील नगरपंचायत हद्दीतील इमारत भारतीय स्टेट बँकेला शेख हरूण शेख जाफर आणि शेख युनूस शेख जाफर या बंधूंनी आपल्या संयुक्त मालकीची जागा १ एप्रिल २०१६ ते १ एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये भाड्याने घेतलेली होती त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतीय स्टेट बँकेने या शाखेचे स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी शाखा सुरू केली.मात्र हे स्थलांतरण करत असताना पहिल्या जागेचा रितसर ताबा जागा मालकाकडे न देता कुलूप लावून त्यावर बँकेचा ताबा ठेवला.जागा मालक शेख हरूण आणि शेख युनूस यांनी अनेक वेळा जागा परत ताब्यात देण्याची मागणी केली असता शाखाधिकारी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता शाखेचे सल्लागार यांच्या सल्ल्यानुसार त्यांना उद्धट आणि उर्मट वागणूक दिली या जागा मालकांनी अनधिकृत ताबा आणि भाड्याच्या फरकाच्या रक्कमेची वेळोवेळी मागणी केली.परंतु शाखाधिकार्यांनी मनमानी करून जागा मालकाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे जागा मालक शेख हरवून आणि शेख युनूस यांनी शाखेच्या इमारतीसमोर उपोषण आंदोलन सुरू केले.या उपोषणाची दखल अधिवक्ता परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष अॅड. बाबूराव अनारसे, आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती रंगनाथ धोंडे, मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेटचे चेअरमन नामदेव राऊत, सामाजिक कार्यकर्ते सय्यद शफी यांनी घेऊन शाखाधिकारी यांचे शी संपर्क केला त्यानंतर अखेर सायंकाळी शाखाधिकारी यांनी जागेचा ताबा देऊन फरकाची रक्कम देणे बाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते जागा मालकांनी उपोषणाची सांगता केली भारतीय स्टेट बँक शाखेच्या शाखाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबद्दल ग्राहकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.