आमदार धस यांनी घेतली झाडाझडती;अधिका-यांशी ‘वन बाय वन’ केली चर्चा
विकास कामांची कारणमीमांसा,पदाधिकाऱ्यांची कानउघडणी
आष्टी click2ashti-गेल्या दहा वर्षांत विकिसकांमाची बसलेली खिळ व अधिकारी यांची कामात चाललेली टंगळ-मंगळ,मतदार संघातील घडविलेली,रखडलेली कामांचा आढावा बैठकीत समाचार घेत प्रत्येक अधिका-यांशी वन बाय वन चर्चा करत
गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचीही कान उघडतील आमदार सुरेश धस यांनी केली.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाची आढावा बैठक आमदार सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या उपस्थितीत शुक्रवार (दि.१०)रोजी सायंकाळी ७.३० वा.पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.यावेळी आ.सुरेश धस बोलत होते.या प्रसंगी उपविभागीय अधिकारी वसिमा शेख, तहसिलदार वैशाली पाटील यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,मतदार संघातील अर्धवट,किरकोळ राहिलेले कामे अधिकारी व गावक-यांनी मिळवून समझोता करून मार्गी लावावा.जर तुमच्या लेव्हलला ला प्रश्न नाही मिटला तर वरिष्ठ अधिकारी,आणि माझ्याकडे संपर्क साधावा मी तो प्रश्न मार्गी लावीन.यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक म्हणाले,जे जलजिवनचे काम अर्धवट किरकोळ राहिलेले आहेत ते सर्वांनी मिळवून मार्गी लावावे.यासह विविध विषयांवर चर्चा करत रात्री उशिरा पर्यंत आमदार धस यांनी अधिका-यांशी वन बाय वन चर्चा करत सुचेना देण्यात आल्या.