केज click2ashti-संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मीक कराडवर अखेर मकोका लावण्यात आला आहे.खंडणी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. केज न्यायालयाने आता वाल्मीक कराडची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे.मकोका लावल्यानंतर सीआयडी पुन्हा वाल्मीक कराडच्या कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती आहे.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहेत. यात खंडणी प्रकरणी अटकेत असलेला वाल्मीक कराडची 14 दिवसांची पोलिस कोठडी आज संपली. कराडला आज केज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.आता वाल्मीक कराड हत्याप्रकरणात गुन्हा दाखल होणार का? हे पहावे लागणार आहे.
दरम्यान न्यायालयात नेण्यापूर्वी बीड शहर पोलिस ठाण्यात डॉक्टरांना बोलावून वाल्मीक कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.त्यांच्यावर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असला तरी वाल्मीक कराडच्या सांगण्यावरुनच संतोष देशमुख यांना ठार मारण्यात आल्याचा आरोप होत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.