रजेवरुन भांडण; चार कर्मचाऱ्यांना चाकुने भोसकले
कोलकाता I वृत्तसंस्था
रजा मागितल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात एका कर्मचाऱ्याने चार कर्मचाऱ्यांना चाकुने भोसकले असून हल्लेखोर रक्ताने माखलेला चाकू हातात घेत थेट फिरत असल्याची घटना कोलकाता येथे घडली. हल्ल्यानंतर तो कार्यालयातून बाहेर पडला आणि रस्त्यावर धावू लागला. प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये तो दिवसाढवळ्या चाकू, पाठीवर बॅग आणि हातात दुसरी बॅग घेऊन फिरताना दिसत आहे.
घोला (सोडेपूर जि.उत्तर २४ परगणा) येथे तांत्रिक शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अमित या कर्मचाऱ्याने रजा मागितली होती. मात्र रजेवरून सहकारी कर्मचाऱ्यांशी भांडण झाले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने सहकारी कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. जयदेव चक्रवर्ती, शंतनू साहा, सार्थ लाटे आणि शेख सताबुल या चार जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर हल्ल्यानंतर अमित सरकार कार्यालयातून बाहेर पडला आणि रस्त्यावर धावू लागला. प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये तो दिवसाढवळ्या चाकू, पाठीवर बॅग आणि हातात दुसरी बॅग घेऊन फिरताना दिसत आहे. तो रस्त्यावरून जाणाऱ्यांना त्याच्या जवळ न येण्याचा इशारा देत आहे. वरिष्ठांनी अमितला सुटी देण्यास नकार दिल्याने तो संतप्त झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला सुटी का देण्यात आली नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. सरकारला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तो मानसिक आजारी असल्याचा पोलिसांना संशय आहे