व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

साखर झोपेत दोन मुलांना मारुन नवऱ्यावरही केले कोयत्याने वार

0

पुणे I प्रतिनिधी
पोटच्या लोकरांना साखर झोपेत असताना जन्मदात्या आईने पहाटे त्यांचा गळा दाबून खून केल्याची घटना जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली. एवढेच नाही तर मुलांना मारल्यावर या महिलेने स्वत:च्या नवऱ्यावरही कोयत्याने हल्ला केला. जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना स्वामी चिंचोली गावात घडली.

स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती येथे दुर्योधन मिढे हे पत्नी कोमल आिण शंभू व पियू या दोन मुलांसह राहात होते. काही कारणावरुन पती पत्नीमध्ये वाद झाले. या वादातून पत्नी कोमल (30) हिने मुलगा शंभू (1) आिण पीयू (3) या दोन्ही पोटच्या मुलांना पहाटे गळा दाबून मारुन टाकले. यनंतर पती दुर्योधन यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यात त्यांच्या मानेवर व हातावर जमखा झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.