दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता
नवी दिल्ली I वृत्तसंस्था
देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहिर झाला असून भाजपने ४२ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाला केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून दिल्लीत २७ वर्षांनी भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली मात्र स्पष्ट बहुमत मिळाले नाही. यामुळे हरियाणा आिण महाराष्ट्रात भाजपला निवडणूक अवघड जाईल असे िचत्र असताना या दोन्ही राज्यात भाजपला बहुमत मिळाले. यानंतर आज झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. या निवडणुकीत आपचे मुख्य नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर आतिशी या निवडून आल्या आहेत.