व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राहुल सोलापूरकर यांना जोड्याने मारा : जितेंद्र आव्हाड

0

मुंबई । वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर चर्चेत आलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विधान करुन पुन्हा वाद ओढावून घेतला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

राहुल सोलापूरकर यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं विधान केले होते. यामुळे या विधानावरून राज्यभरात पडसाद उमटले होते. सोलापूरकरचा निषेध म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलनं करण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांनीही सोलापूरकर याच्या विधानाचा निषेधही नोंदवला होता. तर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकरला गोळ्या घालण्याची भाषा केलेली होती. हे प्रकरण ताजे असतानाच वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असा जावई शोध राहुल सोलापूरकर याने लावला आहे. सोलापूरकर याने नवीन वादग्रस्त विधान करून पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.