एसटी कर्मचाऱ्यांना आगारात मिळणार मोफत वैद्यकीय सेवा
राज्यातील आगारामध्ये शंभर खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई । प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. आगार तेथे १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय योजनेअंतर्गत राज्यातील एसटी आगारांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे खोपट बसस्थानकातील विश्रांतीगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेचा शुभारंभ होत आहे. या रुग्णालयात भविष्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी आणि सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार. भविष्यात या रुग्णालयांमध्ये शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असेही ते म्हणाले.