राहुल सोलापूरकर यांना जोड्याने मारा, एक लाख बक्षीस मिळवा
मुंबई । वृत्तसंस्था
महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी जनतेला आवाहन केले आहे. राहुल सोलापूरकर यांचं तोड चपलेने फाेडणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस देणार असल्याचे कोळी यांनी म्हटले आहे.
अिभनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आिण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. या घटनेने महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडण्याची भीतीही काही राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि राहुल सोलापूरकर याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणही तापले आहे. दरम्यान ‘महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचंय की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी जी वाक्य उच्चारली आहे, अशा राहुल सोलापूरकरची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चप्पलेनं त्याचं तोंड फोडा त्याचं तोंड रंगवा’, असं थेट आव्हानच ठाकरे गटातील शरद कोळी यांनी जनतेला दिलंय. इतकंच नाहीतर तो कोणी हे आव्हान पूर्ण करेल त्याला एक लाखांचं बक्षीस देणार असं म्हटलं आहे.