व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

एकनाथ शिंदे यांना पुरस्कार, शरद पवारांच्या हस्ते होणार वितरण

0

मुंबई । प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त सरहद पुणे यांच्या वतीने शिवसेनेेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉग्रेसचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना सन्मानित केले जाणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात ११ फेब्रुवारी रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.